Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थीम पार्कमध्ये पाळणा कोसळून एकाचा मृत्यू

थीम पार्कमध्ये पाळणा कोसळून एकाचा मृत्यू
चेन्नई , शुक्रवार, 13 मे 2016 (11:33 IST)
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये किश्किंता थीम पार्कमध्ये फिरता पाळणा अचानक कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहेत.
 
जॉय राईडची चाचणी करत असतानाच हा अपघात घडल्याची माहिती आहे. पाळणा अंगावर पडल्यामुळे त्याखाली दबून कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव मणीकंदन असून तो 20 वर्षांचा होता. तर जखमी झालेले सातही जण या पार्कचेच कर्मचारी आहेत. दरम्यान स्थानिक प्रशासनानं या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत पुन्हा छमछम