Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीत जुन्या डिझेल वाहनांवर बंदी

दिल्लीत जुन्या डिझेल वाहनांवर बंदी
दिल्ली , मंगळवार, 19 जुलै 2016 (11:01 IST)
राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने संबंधित इतर विभागांनाही कचरा जाळल्याने होणा-या हवा प्रदुषणासंबंधी अहवाल मागवला आहे. ट्रकला मात्र या निर्णयातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हा आदेश दिला असून तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या डिझेल वाहनांची यादी दिल्ली वाहतूक पोलिसांकडे सोपवण्यात यावी असंही राष्ट्रीय हरित लवादाने आरटीओला सांगितलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट