Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

''देव द्या, देवपण घ्या” उपक्रमास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद

''देव द्या, देवपण घ्या” उपक्रमास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (14:37 IST)
नाशिक गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे शहरातील सुमारे ११,५७८ भाविकांनी गणेशमूर्ती  दान दिल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी  दिली.
 
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या ६ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवात १० दिवस सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला.
 
विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे सुमारे २०० कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. गुलाबी रंगाचे विद्यार्थी कृती समितीच्या नावाचे आकर्षक  टी-शर्ट घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते.
 
यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. ६ फुटापेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या व घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती यावेळी दान करण्यात आल्या. या मुर्ती अत्यंत  भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, रोहित कळमकर, जयंत सोनवणे, सागर बाविस्कर, प्रशांत खडालकर, अभिजित पाटील, नितेश  विश्वकर्मा, राहुल मकवाना, सिद्धांत आमले, केदार कुरकुरे, ललित पिंगळे, आकाश भामरे,, योगेश दाते, राहुल  आदींनी परिश्रम घेतले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमधील पहिले पर्यावरण संवर्धनासाठीचे प्रदर्शन