Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन भारतीयांना रेमन मॅगसेसे पुरस्कार

दोन भारतीयांना रेमन मॅगसेसे पुरस्कार
नवी दिल्ली- मानवाधिकार कार्यकर्ते बेझवाडा विल्सन आणि संगीतकार टी.एम. कृष्णा या दोन भारतीयांना आशियातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेसे फाउंडेशनने या पुरस्कारांची घोषणा केली.
 
बेझवाडा विल्सन हे मूळचे कर्नाटकमधील असून दलित कुटुंबात जन्मले आहेत. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी ते सातत्याने लढत असतात. याच कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. तर, संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामासाठी संगीतकार टी. एम. कृष्णा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 
 
फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती रेमन मॅगसेसे यांच्या नावाने या पुरस्कारांचे वितरण केले जाते. निस्वार्थ सेवेसाठी आशियातील व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. विल्सन आणि कृष्णा यांच्या व्यतिरिक्त फिलीपिन्स, इंडोनेशिया, लाओस आणि जपानमधील चार लेखकांनाही हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकवरून हटवणे का जरूरी आहे आपली जन्म तारीख!