Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा सत्ता

प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा सत्ता
कोलकाता , गुरूवार, 19 मे 2016 (11:34 IST)
पश्चिम बंगालमध्ये 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 210 पेक्षाही अधिक जागांवर बहुमत मिळवलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे.

डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 35, तर काँग्रेसला 31 म्हणजे दोघांना मिळून  66 जागांवरच आघाडी मिळवता आली. प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच मोठं यश मिळवलं आहे.

भाजपला 7 जागांवर बहुमत मिळवता आलं.ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी मागे