Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाबः PAK बॉर्डरवर कोटी रुपयांची हिरॉईन जप्त

पंजाबः PAK बॉर्डरवर कोटी रुपयांची हिरॉईन जप्त
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (12:15 IST)
पंजाबमध्ये सीमा सुरक्षा बल नशा विरोधात कडक कारवाई करताना दिसत आहे. मद्यप्राशन विरुद्ध काटेकोरपणे उभे दिसत आहे. सीमा सुरक्षा बलच्या जवानांनी मागील दोन दिवसांपासून सीमापार हून येत असलेली नशेची मोठ्या प्रमाणात खेप जप्त केली आहे. जवानांनी तपास अभियानात सीमेपार पाठवण्यात येणारी कोटी रुपयांची हिरॉईन जप्त केली आहे.  
 
पंजाबमध्ये नशाची इतकी भयानक लत आहे की बॉलीवूड देखील तिथल्या परिस्थितीला फिल्मी पडद्यावर दाखवण्याची हिंमत दाखवत नाही. नुकतेच आलेले चित्रपट 'उड़ता पंजाब' राज्यात नशेची स्थिती चांगल्या प्रकारे जाणीव करवून देते. नशा विरुद्ध लढाईत आता राज्य सरकार ते सेना पूर्ण जोर लावून अभियान चालवत आहे.  
 
या दरम्यान सोमवारी पंजाबच्या अमृतसर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी सीमेपार तस्करी करून येत असलेली दोन किलो  हिरॉईन जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत दहा कोटी रुपये सांगण्यात येत आहे.  
 
पंजाब फ्रंटियरचे प्रवक्ते एनपी नेगीने याबद्दल सांगितले की भारत-पाकिस्तानच्या उध्धर धारीवाल सीमा चौकीत सुरक्षा बलाच्या जवानांनी तपास मोहीम चालवली होती. या दरम्यान जवानांनी सीमा सुरक्षा घेर्‍या जवळ दोन पॅकेट जप्त केले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरसिंगने जाणूनबुजून उत्तेजकसेवन!