Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावाय : सिध्दराम

पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावाय : सिध्दराम
बंगळुरू , शनिवार, 10 सप्टेंबर 2016 (10:04 IST)
कावेरी नदीचे पाणी तमिळनाडूस सोडणत येत असल्यामुळे कर्नाटकात अत्यंत अशांत परिस्थिती निर्माण झाली असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती मुख्मंत्री सिध्दरामय्या यांनी केली. 
 
मोदी यांनी काही तासांची सूचना देऊन दोन्ही राज्यांच्या मुख्मंत्र्यांची बैठक बोलवावी, असेही सिध्दरामय्या यांनी सुचविले आहे. कर्नाटकात शुक्रवारी 12 तासांचा बंद पाळण्यात आला. राज्यांमध्ये  अशांत परिस्थिती राहिल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 1995 मध्ये अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला असताना सर्वोच्च्य न्यायालयाने पंतप्रधानांना वाद मिटविण्याचा निर्देश दिला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. सर्वोच्च्य न्यायालयाच्या  आदेशानंतर सध्या कर्नाटक सरकार 15 हजार युसेक्स पाणी मंगळवारपासून तमिळनाडूला सोडत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

..तर कपिलचं शूटिंग बंद पाडू; मनसेचा इशारा