Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तान विविध दहशतवादी‘काळा दिवस’ : भारताने पाकला खडसावले

पाकिस्तान विविध दहशतवादी‘काळा दिवस’ : भारताने पाकला खडसावले
नवी दिल्ली , शनिवार, 16 जुलै 2016 (06:51 IST)
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमंडर दहशतवादी बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मिरी जनतेशी सलगी दाखवत 19 जुलै हा ‘काळा दिवस’ घोषित करणार्‍या पाकिस्तानची भूमिका भारताने गंभीरपणे घेतली आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करणे, भारतीय प्रदेशात दहशतवादाला खतपाणी घालून अस्थिरता निर्माण करणे, तसेच इतर विध्वंसक गोष्टी करणे सोडून द्यावे अशा शब्दात खडसावत भारताने पाकिस्तानला इशाराच दिला आहे.
 
संघटनाच्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचे काम करत आहे, असे म्हणत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानवर टीकेचे प्रहार केले आहेत. पाकिस्तान दाखवत असलेली सहानुभूती बेगडी असल्याचेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
 
याबरोबर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने विशेष मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबतच्या निर्णयाचा भारत स्पष्ट शब्दात धिक्कार करत आहे, अशा शब्दात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी पाकिस्तानचा निषेध केला आहे. स्वरूप म्हणाले, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तान पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करत असल्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. पाकिस्तान किंवा अन्य कुणालाही आमच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा हक्क नाही असे आम्ही पुन्हा एकदा बजावू इच्छितो.ज्याअर्थी पाकिस्तान प्रतिबंध घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचे उदात्तीकरण करत आहे, त्याअर्थी पाकिस्तानची सहानुभूती खोटी आहे हे स्पष्ट होते, असेही स्वरूप पुढे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2.25 रुपयांनी पेट्रोल स्वस्त