नवी दिल्ली- विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) ने ब्रेडसंबंधात जारी केलेले अहवाल हैराण करणारे आहे. याप्रमाणे रोज ब्रेड किंवा पाव खाणार्यांना कर्करोग होण्याची शक्यता आहे.
ब्रेड, पाव आणि बन यासह रोजच्या उपयोगातील ब्रेडच्या 38 नमुन्यांची विज्ञान व पर्यावरण केंद्रात चाचपणी करण्यात आली. यातील 84 टक्के नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट यासारखे घातक रसायन आढळून आले असून, त्यामुळे कर्करोगाचाच धोका अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनात महत्त्वाचा घटक असलेला आणि रोज सकाळी घराघरात खाण्यात येणार्या ब्रेड आणि पावमध्ये कर्करोगाला आमंत्रण देणारे रसायन आढळून आले आहे. राजधानी दिल्लीत ब्रेडच्या काही नमुन्यांची चाचणी केल्यानंतर याबाबतचा अहवाल आज सोमवारी जारी करण्यात आला.
ज्या ब्रँडचे नमुने तपासले त्यात ब्रिटानिया, हार्वेस्ट गोल्ड आणि फास्ट फूड चेन जसे केएफसी, पिज्जा हट, डोमिनोज, सब-वे, मॅकडोनाल्ड आणि स्लाइस आफ इटली चे नमुने समाविष्ट आहे.
यातील एक रसायन 2बी कार्सिनोजेन प्रकारचे असून, ते घातक असतानाही भारतात त्यावर अद्यापही बंदी घालण्यात आली नाही. ब्रेड आणि पावासोबतच पिझ्झा ब्रेड आणि बर्गर ब्रेडचीही चाचपणी करण्यात आली असून, हे पदार्थ दिल्लीत अतिशय लोकप्रिय आहेत. भारतातील अनेक शहरांमध्येही ते आवडीने खाल्ले जातात.
आम्ही आमच्या प्रयोगशाळेसोबतच अन्य काही प्रयोगशाळांमध्येही या नमुन्यांची चाचणी केली असून, त्यांचा अहवालही सकारात्मक आहे. ही रसायने मानवी आरोग्याला अपायकारक असून, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे विज्ञान व पर्यावरण केंद्राचे उपसंचालक चंद्र भूषण यांनी सांगितले.