Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपने सिंह यांना पदावरुन हटविले

भाजपने सिंह यांना पदावरुन हटविले
लखनौ- बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची वेश्येसोबत तुलना करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर तातडीने कारवाई करण्यात आली असून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दयाशंकरसिंह यांनी मायावती यांची तुलना वेश्येसोबत केल्याने वाद निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर संसदेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले, मी या वक्तव्याचा निषेध करतो. आम्ही या प्रकरणाचा तपास करू. असे म्हणत जेटली यांनी या प्रकरणी व्यक्तिगतरीत्या दिलगिरी व्यक्त केली. तसेच मी तुमचा सन्मान करतो आणि तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आगामी 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस