Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत-पाक सीमेवर शंभर कोटींचे हेरॉइन जप्त

भारत-पाक सीमेवर शंभर कोटींचे हेरॉइन जप्त
अमृतसर , गुरूवार, 14 जुलै 2016 (11:36 IST)
पाकिस्तानी नागरिकांनी स्मगलिंग करीत भारतात टाकलेले 20 किलो हेरॉइन (अंदाजे किंमत 100 कोटी रुपये) बुधवारी सीमासुरक्षा दलाने भारत-पाक सीमेवर जप्त केले.
 
स्मगलर्सने हेरॉइनची पाकिटे भारतीय सीमेवरील तारेच कुंपणाच आत टाकली होती. नारली सीमा चौकीनजीक भिंकीविंद येथे पहाटेच्या   सुमारास भारतीय जवानांनी ही पाकिटे जप्त केली. भारतीय जवानांनी पाकिटे टाकणार्‍या स्मगलर्सवर गोळीबार केला. परंतु ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. एक किलो वजनाची जवळपास 21 पाकिटे तसेच पाकिस्तानी बनावटीची तीन काडतुसे व बेरेटा इटालीन पंप अँक्शन बंदूक जप्त करणत आली आहे. काडतुसांवर पाकिस्तानातील डब्लूएएच कंपनीचा शिक्का आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोध्रा रेल्वे जळीत; प्रमुख आरोपीस मालेगावमध्ये अटक