Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचा नकाशा चुकल्यास 100 कोटींचा दंड

भारताचा नकाशा चुकल्यास 100 कोटींचा दंड
दिल्ली , शुक्रवार, 6 मे 2016 (10:45 IST)
केंद्र सरकारनं जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केलं आहे.  या बिलानुसार भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीनं दाखवलात तर 7 वर्षांच्या तुरुंगवासासह 100 कोटींचा दंड भरावा लागणार आहे.

 अनेकदा इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर भारतीय नकाशाच्या सीमा चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या जातात. काही दिवसांपूर्वीच टि्वटरच्या माध्यमातून भारताच्या नकाशात काश्मीर चीनचा भाग तर जम्मू पाकिस्तानात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं त्या नकाशात सुधारणा केली होती. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं हे बिल तयार केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींची बीएची पदवी दाखवा : केजरीवाल