Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला चीनचा खोडा

भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला चीनचा खोडा
दिल्ली , शुक्रवार, 24 जून 2016 (11:25 IST)
ताश्कंदमध्ये झालेल्या बैठकीत चीनने भारताच्या एनएसजी गटात सहभागी होण्याला विरोध केला आहे. आण्विक पुरवठादार देशांचा गट म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्याच्या भारताच्या मार्गात चीनी ड्रॅगनने खोडा घातला आहे.

ताश्कंदमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांची भेट घेऊन एनएसजीसाठी मदत मागितली, मात्र जिनपिंग यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही.

भारताने अद्यापही आण्विक अप्रसार करारावर स्वाक्षरी केलेली नाही, याच कारणामुळे भारताच्या एनएसजी गटात सहभागी होण्याला चीनसह इतर देशांनी विरोध दर्शवला आहे.

एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार होती. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाच्या प्रयत्नांवर आपल्या विरोधाचे स्पष्ट संकेत देताना चीनने बुधवारी एनएसजीच्या सदस्यांमधील मतभेदांचा दाखला दिला होता. यापूर्वी अमेरिका आणि फ्रान्स यांनी भारताची बाजू घेताना सदस्य देशांनीही भारताला पाठिंबा द्यावा,  असे आवाहन केले होते. भारताला सुमारे वीस देशांचा पाठिंबा आहे. मात्र, एनएसजीमधील निर्णय सर्वसंमतीने होत असल्यामुळे भारताच्या मार्गात चीनने अडथळा आणला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला