नवी दिल्ली- देशातील 7 कोटी लोकं मधुमेहच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 2014 मध्ये 6.68 कोटी तर 2015 मध्ये 6.91 कोटी लोकांना डायबेटीस होता. 20 ते 70 वयोगटातील लोकांची तपासणी केली असता ही माहिती समोर आली होती. आता मात्र हा आकडा 7 कोटींच्या जवळ गेला असल्याचे आंतरराष्ट्रीय डायबेटीस फेडरेशनने सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.