Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा खून

मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा खून
, बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (17:20 IST)
शुल्लक कारणाने राग येऊन एका तरुण कैद्याने एका वयस्क कैद्याचा खून केल्याची घटना नाशिक मध्यवर्ती कारागृह्त घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहांची अंतर्गत सुक्षेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
 
यामध्ये टोपी न दिल्याचा राग मनात घेत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याचा खून केला आहे.  नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दोन दिवसांपूर्वी टोपीवरुन कारागृहात दोन कैद्याचे मारामारी झाली ,मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कैद्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारामारीच्या गुन्ह्यात सचिन कन्हैया चावरे (३६) याला पाच महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत आहे. तर ज्या कैद्याचा खून झाला आहे, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता. तान्हाजी मारुती माने (७०) असे त्याचे नाव असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सोमवारी संशयित चावरे याने मानेकडे टोपी मागितली असता मानेने नकार दिला. या गोष्टीचा राग येऊन चावरे याने कारागृहातील वीट मानेच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शस्त्रास्त्रे विक्री करणाऱ्या आंतरराज्यय टोळीला पकडण्यात पोलिसांना यश