Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांनी व्हाट्सअॅप वापरताना सवाध रहावे: उच्च न्यायालय

महिलांनी व्हाट्सअॅप वापरताना सवाध रहावे: उच्च न्यायालय
मित्र- मैत्रिणींशी व्हॉट्स अॅपवर संवाद साधताना महिलांनी सावध रहावं, प्रोफाइल पिक्चर ठेवताना, फोटो शेअर करताना काळजी घ्यावी असा सल्ला मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला आहे. 
 
एका तरुणाने 16 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं व तिच्यावर बलात्कार करून त्याचं चित्रण केलं. तसेच, हा व्हिडीयो व्हॉट्स अॅपवर टाकायची धमकी दिली, या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी व्हॉट्स अॅपच्या तोट्यांबाबत महिलांना जागरूक होण्याचा सल्ला दिला आहे. या गुन्ह्याप्रकरणी न्यायाधीशांनी आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यासही नकार दिला आहे.
 
मुलगी हरवल्याची तक्रार गेल्या महिन्यात वडिलांनी दिली होती. पोलीसांनी तपास केला असता अजिथ नावाच्या तरूणाने तिला पळवल्याचे आणि बलात्कार केल्याचे आढळले. तसेच, तिला ब्लॅकमेल करून अजिथने तिला त्याच्या मित्रांबरोबरही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली.
 
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीस एस. वैद्यनाथन यांनी व्हॉट्स अॅपमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यामुळे महिलांनीही व्हॉट्स अॅपसारखी साधनं वापरताना काळजी घ्यायला हवी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘इसिस’च्या रडारवर 285 भारतीय