Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मान्सून परतला आहे मात्र दोन आठवडे उशिरा

मान्सून परतला आहे मात्र दोन आठवडे उशिरा
, बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (10:00 IST)
भारतातील असलेला मान्सून येत्या 3-4 दिवसात देशाच्या उत्तर-दक्षिण भागातून परतीच्या वाटेवर निघणार आहे असे चित्र आहे. मात्र दरवेळी मान्सून साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात निघतो, तर यावेळी मान्सून जवळजवळ दोन आठवडे उशीराने परतत आहे. या प्रकारची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 
 
भारतात उत्तर नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यास वातावरण अनुकूल होत आहे. असे असल्यामुळे येत असलेल्या ५ ते ६ दिवसात राजस्थानच्या काही भागातून मान्सून निरोप घेणार आहे.तर देशाचा विचार केला पडलेला पाऊस सरासरीच्या 5 किवा ४ टक्के कमी आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या नव्या भाकीताने चिंता अजून वाढली आहे. 
 
देशात सरासरीपेक्षाही कमी पाऊस आहे. देशात मान्सूनने निरोप घेण्याच संकेत दिल्याने खरीप हंगामातील पीकं धोक्यात आहेत. देशभरातील लाखो हेक्टरवर यावर्षीही दुष्काळाचं सावट आहे. दरम्यान हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार, असं भाकीत केलं होतं. पण मात्र अचानक अशी भूमिका घेतली त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना लढविणार गोव्यातील 20 जागा