गांधीनगर- गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात फेसबुकवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. पक्षाला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार असल्याचे आनंदीबेन यांनी फेसबुकद्वारे म्हटले आहे.
आनंदीबेन यांच्या या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उत आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राजीनामा का देणार याचे कारणही सांगितले आहे. त्या म्हणाल्या, मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. त्यामुळे मी सर्वोच्च पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवा नेतृत्वाला यापुढे संधी मिळावी.
पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, मी भाजपचे विचार, सिद्धांत आणि अनुशासनामुळे प्रेरित आहे. मी त्याचेच पालन करत आली आहे. दोन वर्षापासून पक्षात अशी परंपरा आहे की, वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यास सदस्य मोठय़ा पदावरून मुक्त होत आहेत. हीच परंपरा कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे.