Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी सरकारने पाकविरुध्द कारवाई करावी : उध्दव

मोदी सरकारने पाकविरुध्द कारवाई करावी : उध्दव
मुंबई , गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (11:48 IST)
पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. त्यांनी पाकवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 
 
शिवसेना भाजपचा मित्रपक्ष आहे, असे लक्षात आणून दिल्यावर मित्रपक्ष आहोत असे आम्ही समजतो असे सांगत उद्धव यांनी भाजपला टोला लगावला.
 
ते म्हणाले, विरोध दर्शविण्यासाठी अधिवेशनातील चहावरसुद्धा आपण बहिष्कार टाकतो. पंतप्रधान मोदी मात्र पाकिस्तानमध्ये आवर्जून जाऊन चहापान करतात.तसेच, पठाणकोट हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली होती. तर हलगर्जीपणा कोणी केला असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.मराठा आरक्षणावर..शिवसेनेची मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन बोलवून त्यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित करावे. शरद पवार यांची त्यावर काय भूमिका काय आहे ती त्यांनी मांडावी. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याचा पहिला दिवस ... Live Scorecard