Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहन भागवत घेणार लिओनार्डो डी कॅप्रिओची भेट

मोहन भागवत घेणार लिओनार्डो डी कॅप्रिओची भेट
दिल्ली , शुक्रवार, 24 जून 2016 (11:38 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच ऑस्कर विजेता लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि उद्योजक रिचर्ड ब्रॅनसन यांची भेट घेणार आहेत.  भागवत पुढील महिन्यात दोन दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात लिओनार्डो आणि ब्रॅनसन यांनी भागवतांना विशेष निमंत्रण दिलं आहे.

भागवत इंग्लंड भेटीदरम्यान हिंदू स्वयंसेवक संघाने  30-31 जुलै रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबीराला उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक देशभरातल्या हिंदू स्थलांतरितांना मार्गदर्शनही करणार आहेत.

विशेष म्हणजे लिओ आणि ब्रॅनसन हे दोघेही शाकाहारी आहेत. त्यामुळे भागवतांच्या भेटीदरम्यान संघाने गोवंश हत्या बंदीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं आणि शाकाहाराचं समर्थन करणार आहेत. लिओनार्डो डी कॅप्रिओ इंग्लंडमध्ये प्राण्यांची कत्तल रोखण्यासाठी आधीपासूनच एका संघटनेच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदाची पंढरपूर वारी ‘निर्मल’