Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या पुढे दहशतवादावर चर्चा, पाकला धाडेल पत्र

या पुढे दहशतवादावर चर्चा, पाकला धाडेल पत्र
नवी दिल्ली- पराराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे पराराष्ट्र सचिव अझिझ चौधरी यांना पत्र लिहून यापुढे फक्त सीमेवर होणार्‍या दहशतवादावर चर्चा होईल असे सांगितले. 
 
15 ऑगस्टला पाकिस्तानच्या पराराष्ट्र सचिवांनी एस. जयशंकर यांना पत्र पाठवून चर्चेचे आमंत्रण देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 19 ऑगस्टला काश्मीरमधल्या हिंसाचारप्रकरणी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने औपचारिक चर्चेचे निमंत्रण भारताला पाठवले होते. या पत्राला याआधीच भारताने उत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत चर्चा होईल पण पाकिस्तानने ठरवून दिलेल्यायापुढे दहशतवादावर चर्चा, पाकिस्तानला धाडले पत्र विषयांवर नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले होते. 
 
भारत पाकिस्तानशी काश्मीरविषयी नाही तर सीमेवर होणार्‍या दहशतवादावर चर्चा करेल असेही भारताकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर पाकिस्तान चर्चा करण्याचे गांभीर्याने घेत असेल तर दोन्ही देशांमध्ये काही मुद्दय़ावर सुरूवातीपासून चर्चा व्हायला हवी. यात पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ला देखील चर्चीला गेला पाहिजे असेही भारताने पत्रात म्हटल्याचे समजते. 
 
पाकिस्तानला चुकीचे मुद्दे काढून खेळी करायची असेल तर आम्हाला देखील असे खेळ खेळता येतात अशीही तंबी पत्राद्वारे भारताने दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पराराष्ट्र सचिव एस. जयशंकर मिळून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची योजना आखत असल्याचीही माहिती सूत्राने दिली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात दंगलीस मोदीच जबाबदार: हार्दिक