Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपी: पद्मावत एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले; प्रवासी जखमी

यूपी: पद्मावत एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले; प्रवासी जखमी
नवी दिल्ली- दिल्लीहून फैजाबादला जात असलेल्या पद्मावत एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने 50 प्रवासी जखमी झाले. उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यातील ब्रजघाट रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे एका बाजूला झुकली. या दुर्घटनेत जिवीतहानी झालेली नाही. 50 प्रवास्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
 
डबे हटविण्याचे काम सुरु असून, लवकरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल. घटनेमुळे इतर गाड्या दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून दुर्घटनेमागील कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एस.टी.कर्मचार्‍यांना 6 टक्के महागाई भत्ता