लाहोर- भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे ‘सार्क’ परिषदेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट होताच ‘जमात-उद-दवाह’चा म्होरक्या हाफीज सईद याने पाकिस्तानात देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निष्पाप काश्मिरी लोकांच्या मृत्यूंना जबाबदार असलेले राजनाथ सिंह हे पाकिस्तानात आल्यास विरोध म्हणून देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हाफीज सईदने दिला. राजनाथ यांचे पाकिस्तानात स्वागत करुन जखमी काश्मिरी लोकांचा अपमान करणार आहे का?, असा सवाल हाफीजने विचारला आहे.