Publish Date: Fri, 14 Aug 2015 (10:00 IST)
Updated Date: Fri, 14 Aug 2015 (11:46 IST)
हुंड्यासाठी विवाहितेच्या छळास कारणीभूत असल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँचा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी लेखी तक्रार अॅड. राजकुमार लक्ष्मण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केलेल्याने राधे माँच्या अडचणींत आणखीनच वाढ होणार आहे.