अयाध्येमध्ये राम मंदिराचे बांधकाम 9 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे, असा निर्णय उज्जैन येथे आयोजित केलेल्या धर्मसंसदेने घेतला आहे.
रामलला परिसरातून मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. नागरिकांच्या मदतीनेच मंदिराचे काम सुरू करणार असल्याची माहिती धर्मसंसदेने दिली आहे. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिराचा वाद अनेक दशके सुरू आहे. मंदिराची 77 एकर जागा असून याचा व मंदिराचा खटला न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मंदिर निर्माण करण्यात येणार असल्याचेही धर्मसंसदेने सांगितले आहे.