रेल्वे प्रिमियम तात्काळ तिकीटं आता आरक्षण खिडकी अर्थातच रिझर्व्हेशन विंडोवर विक्रीस उपलब्ध होणार आहेत. रेल्वेकडून 2014 मध्ये प्रिमियम तात्काळ योजना सुरु करण्यात आली. या कोट्यानुसार ट्रेनचा चार्ट तयार होण्यापूर्वी प्रवासी तिकीट काढू शकतात. तात्काळ तिकीटांच्या तुलनेत प्रिमियम तात्काळचे दर 50 टक्क्यांहून जास्त असतात. ही तिकीटं फक्त आयआरसीटीसीचं लॉगइन असलेल्या प्रवाशांना ऑनलाईन उपलब्ध होती. त्यामुळे दलालांची संख्या वाढत होती, मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे यापुढे ही प्रिमियम तिकीटं रिझर्व्हेशन विंडोवरही उपलब्ध असतील आणि तिकीटाच्या काळाबाजाराला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 26 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे.