Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्‍वेत होणार सोलारचा वापर

रेल्‍वेत होणार सोलारचा वापर
जोधपूर , गुरूवार, 12 मे 2016 (10:56 IST)
भारतातील रेल्‍वेत आता सोलारचा वापर होणार आहे. जोधपूर येथील वर्क शॉपमध्‍ये अशी रेल्‍वे तयार झाली असून आता ती परिक्षणाच्‍या प्रतिक्षेत आहे.

या रेल्‍वेच्‍या छतावर सोलार पॅनेल बसविण्‍यात आले आहेत. यात तयार होणार्‍या विजेवर रेल्‍वेतील दिवे, पंखे चालणार आहेत. या रेल्‍वेच्‍या परिक्षणाला अद्‍याप अधिकृत मान्‍यता मिळालेली नाही पण लवकरच या रेल्‍वेचे परिक्षण होवू शकते.या रेल्‍वेतील दिवे, पंखे सोलार शक्‍तीवर चालणार आहेत.

यामुळे रेल्‍वे प्रशासनाचे लाखो वाचतील पण यासाठी हा प्रकल्‍प वास्‍तवात काम करणे गरजेचे आहे. भारतातील प्रवाशांचा अनुभव लक्षात घेता हे प्रवासी रेल्‍वेवर चढून सोलार पॅनेलचे नुकसानही करू शकतात. काही दिवसापूर्वी रेल्‍वे प्रशासनाने आधुनिक सुविधांसह एक रेल्‍वे ट्रॅकवर आणली होती पण भारतीय प्रवाशांनी तिची अवस्‍थाच बिकट केली होती. या रेल्‍वेबाबतही हीच भीती असून प्रशासन या कारणाने घाबरत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आई होण्याचे स्‍वप्न ७२ वर्षी पूर्ण