Publish Date: Fri, 18 Sep 2015 (11:52 IST)
Updated Date: Fri, 18 Sep 2015 (11:54 IST)
गरीबीविरोधात लढण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र शिक्षण आहे. प्रत्येकाने गरीबानं कितीही त्रास झाला तरी मुलांच्या शिक्षणाशी तडजोड करू नका. मोदींचं आवाहन
- ज्यांच्याकडे स्वत:ची रिक्षा कधीही नव्हती, व जे भाड्याने रिक्षा घेऊन चालवायचे त्यांना आज रिक्षा देण्यात आल्या असून त्यांना बँकेच्या माध्यमातून स्वस्त दरात कर्ज देण्यात आले असून वर्ष दोन वर्षात ते रिक्षाचे मालक बनतिल. - पंतप्रधान मोदी
- गरीबी हटावच्या कार्यक्रमाला पवं तेवढं यश आलेलं नाही. यापुढे गरीबीच्या निर्मूलनासाठी नेटाने प्रयत्न करायला हवेत. - मोदी
- हा फक्त काही रिक्षाचालकांचे नाही तर काशीचं भवितव्य घडवू शकतो असा कार्यक्रम. तंत्रज्ञानाचा प्रवेश गरीबांच्या जीवनात आणण्याचा हा प्रयत्न. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये १०१ ई-रिक्षा व ५०१ सायकल रिक्षांचे वाटप करणार आहेत.
- प्रचंड गाजावाजा करण्यात आलेले पंतप्रधानांचे स्वच्छ भारत मिशन शहरांमध्ये अपयशी ठरल्याचे ७१ टक्के सहभागींनी सांगितल्याचे एका पाहणीत आढळले आहे. मोदींनी स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली, परंतु पुरेसा निधी दिला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदीं वारणसीमध्ये दाखल झाले असून ते आता रिक्षावाल्यांची भेट घेणार आहेत.