Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय रुपानी होणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री

विजय रुपानी होणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री
अहमदाबाद , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (20:06 IST)
विजय रूपानी गुजरातचे नवीन मुख्‍यमंत्री होतील. या अगोदर नितिन पटेल राज्याचे मुख्‍यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. विजय रूपानी वर्तमानात गुजरात भाजपचे अध्यक्ष आहे. 
 
विजय रुपानी यांच्याच गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, तर या स्पर्धेत आघाडीवर असणारे नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. 
 
दोन्ही प्रमुख पदांचा शपथविधी रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्याच्या प्रमुखपदासाठी पक्षाच्या आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. 
 
रुपानी हे गुजरात भाजपचे अध्यक्ष असून, ते आनंदीबेन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार मंत्री होते. रुपानी हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. नंतर ते कर्नाटकचे राज्यपाल झाले. आनंदीबेन यांच्या जागी सर्वांत निर्विवाद उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षात त्यांचे वजन असल्याने मुख्यमंत्रिपदावर त्यांची वर्णी लागली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात : संभावित CM नीतिन पटेलबद्दल जाणून घ्या काही काही गोष्टी