Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांच्या ‘स्वयम्’ उपग्रहाचे प्रक्षेपण

विद्यार्थ्यांच्या ‘स्वयम्’ उपग्रहाचे प्रक्षेपण
श्रीहरिकोटा , बुधवार, 22 जून 2016 (10:28 IST)
पुण्यातल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह ‘कॉर्टोसॅट टू’ या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे. 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी  ‘इस्रो’ सज्ज झालं आहे.

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह ‘कॉर्टोसॅट टू’ या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे. ‘पीएसएलवी 34’ कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी आणि अमेरिकेच्याही काही उपग्रहांना सोबत घेऊन जाणार आहे. या उपग्रहातील 727.5 किलोग्रॅम वजनाचे ‘कार्टो सॅट 2’ हे मुख्य यान आहे. सागरी सुरक्षितता आणि संवाद हे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वयम्’ची निर्मिती करण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे 2008-09 पासून सीओईपी मध्ये शिकलेल्या वेगवेगळ्या शाखांचे सुमारे 170 विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर यासाठी या विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास, परीक्षा, प्रॅक्टिकल्स सांभाळून हे काम केलं आहे.

अवकाशातल्या इतर उपग्रहांनी पाठवलेले संदेश साठवुन ठेवणं आणि त्यांचं डिकोडिंग करुन ते पृथ्वीवर पाठवणं हे स्वयम् चं मुख्य काम असेल. आपत्कालीन परिस्थितीत ही स्वयम् चा वापर व्हावा यासाठी भारतातल्या दहा, तर जगाच्या विविध भागातल्या ग्राऊंड स्टेशन्सशी स्वयम् जोडला जाणार असल्याचंही विद्यार्थी सांगतात.
श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन पीएसएलव्ही सी 34 हे यान एकूण 20 उपग्रहांसह बुधवारी अंतराळात झेपावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 20 उपग्रहांचं अवकाशात एकत्र प्रक्षेपण केलं जाणार आहे. पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘कार्टोसॅट 2’ सोबत 19 उपग्रहांचं सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हत्येसाठी वापरलेली मोटरसायकल तावडेची