Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेंकैया नायडूंनी केली 27 नवीन स्मार्ट शहरांची घोषणा, सर्वात जास्त महाराष्ट्रात

वेंकैया नायडूंनी केली 27 नवीन स्मार्ट शहरांची घोषणा, सर्वात जास्त महाराष्ट्रात
नवी दिल्ली , मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (17:43 IST)
केंद्रीय शहरी विकास मंत्री एम वेंकैया नायडू यांनी आज मोदी सरकाराची महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत 27 स्मार्ट शहरांची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, स्मार्ट शहरांची जागा भरण्यासाठी एकूण 63 नाव आले होते ज्यात 27 नावांची निवड करण्यात आली. हे 27 शहर 12 राज्यांमधून निवडण्यात आले.  
 
हे आहे नवीन स्मार्ट सिटी- आगरा, अजमेर, अमृतसर, औरंगाबाद, ग्वालियर, हुबली-धारवाड, जलंधर, कल्याण-डोंबिवली, कानपूर, कोहिमा, कोटा, मदुरै, मंगलुरु, नागपूर, नामची, नाशिक, राउरकेला, सलेम, शिवामोगा, ठाणे, थंजावुर, तिरूपती, तुमाकुरु, उज्जैन, वडोदरा, वाराणसी, वैल्लोर. महाराष्ट्रातून 5, तामिळनाडू आणि कर्नाटकाहून 4-4, यूपीतून 3, पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून 2-2, आंध्रप्रदेश, गुजरात, ओडिशा, नागालँड, आणि सिक्कीमहून 1-1 शहरांना सामील करण्यात आले आहे.  
 
या अगोदर सरकारने 33 स्मार्ट शहरांची घोषणा केली होती ज्यांना ‘स्मार्ट सिटी’ प्रमाणे विकसित करण्यात येईल. यात पाणी आणि विजेची  सुनिश्चित आपूर्ती, स्वच्छता आणि ठोस अपशिष्ट प्रबंधन प्रणाली, प्रभावी शहरी आवागमन आणि सार्वजनिक परिवहन, आयटी कनेक्टिविटी व ई-शासन समेत इतर सुविधा असतील. मोदी सरकारचे वर्ष 2019-20पर्यंत किमान 100 शहरांचे कायाकल्प करण्याचा लक्ष्य आहे. केंद्र सरकार पाच वर्षांमध्ये या साठी 48 हजार कोटी रुपये वित्तीय मदद प्रदान करत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आंदोलन गंभीर पणे घ्या -- सामना