Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीनगरमध्ये कश्मीर की कली च्या पोस्टरचे विडंबन

श्रीनगरमध्ये कश्मीर की कली च्या पोस्टरचे विडंबन
श्रीनगर - काश्‍मीरमधील तणावजन्य परिस्थितीचे चित्रकार मीर सुहेल यांनी "कश्‍मीर की कली‘ या चित्रपटाच्या पोस्टरचे विडंबन करून पोस्टरवरील अभिनेत्रीचा चेहरा करड्या रंगाने रंगवून डाव्या डोळ्यावर गोळी लागल्याचे दाखविले आहे. या चित्रावरून नवा वाद होण्याची शक्‍यता आहे. 
 
पाच दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या "कश्‍मीर की कली‘ या चित्रपटामध्ये शम्मी कपूर यांच्यासह शर्मिला टागोर यांनी काम केले होते. या चित्राबाबत चित्रकार सुहेल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपले विचार स्पष्ट केले. मी "कश्‍मीर की कली‘च्या चित्राला पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चित्रातील शर्मिला टागोरच्या डोळ्यात बंदुकीची गोळी घुसली असून, शम्मी कपूर तिटकार्‍याने तिच्याकडे पाहत असल्याचे दाखवायचे असल्याचे सुहेल म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्बर मार्गावर आता 12 डब्याची लोकल