Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुभ्रत रॉय जेल मध्ये परत जा - कोर्टाचे आदेश

सुभ्रत  रॉय जेल मध्ये परत  जा - कोर्टाचे आदेश
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (13:40 IST)
सहारा समुहाचे प्रमुख असलेल सुब्रतो रॉय यांची  पॅरोल रजा वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने  नकार दिला मात्र झाले उलट , त्यांना देण्यात आलेली रजा तातडीने रद्द करण्यात येत असून, त्यांनी लगेचच दिल्लीतील तिहार तुरुंगात परतावे, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे रॉय आता पुन्हा तुरुंगात असणार असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तीन ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या  खंडपीठामध्ये सुनावणी झाली आहे. गुंतवणूकदारांना  पैसे परतावा मिळावा या याकरिता  सहारा समुहाची संपत्ती विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सेबीला परवानगी दिली आहे. स रॉय यांनी सेबीकडे आणखी ३०० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आणखी वेळ मिळावा, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचवेळी सुब्रतो रॉय यांचा पॅरोलही वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.मात्र ती परवानगी कोर्टाने नाकारली आहे.तर कोर्टा सोबत वाद घातला म्हणून कोर्टाने रॉय यांच्या वकिलांना चांगलेच सुनावले असून झाली ती सुट्टी पुरे झाली.कोर्टाने काय निर्णय घ्यावा आणि कोणाला सहानुभूती दाखवावि हे कोणी शिकवू नये. असे परखड  मत मांडत कोर्टाने रॉय यांना तुरुंगात लगेच परता असे आदेश दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमद नगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा