”मैंने कहा था कि सेना बोलती नहीं है पराक्रम दिखाती है. लोग कहते थे कि मोदी कुछ नहीं करता है. सेना की तरह ही हमारे रक्षा मंत्री जी भी बोलते नहीं है.” असे बोलत पंतप्रधान यांनी पुन्हा पाकिस्थानला ठणकावले आहे तर आपल्या सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा सैनिकानाचा गौरव केला आहे.भोपाळमधील शौर्य स्मारकाच्या उद्घाटनानंतर मोदी बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण देखील उपस्थित होते. मोदी झोपले आहेत, काही करत नाहीत अशी टीका होत होती, असं सांगत मोदींनी विरोधकांनाही धारेवर धरलं होत.
मदत करताना जवानांनी श्रीनगरमध्ये पूरग्रस्तांना कधीच माणुसकी सोडली नाही, असं सांगत मोदींनी जवानांचं कौतुक केल आहे. तर अनेक देशांकडे आपल्यापेक्षा जास्त सैन्यशक्ती असेल, पण सामान्य नागरिकांशी वागणूक, शिस्त यामध्ये आपले जवान पहिल्या क्रमांकावर असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.