Publish Date: Mon, 28 Sep 2015 (10:34 IST)
Updated Date: Mon, 28 Sep 2015 (10:38 IST)
मणिपूरचे राज्यपाल सैयद अहमद (वय ७३) यांचे कर्करोगाने निधन झाले. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अहमद यांनी १६ मे २०१५ रोजी मणिपूरच्या राज्यपालपदाची शपथ ग्रहण केली होती. महाराष्ट्रातील माजी काँग्रेस नेते अहमद हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते.
तत्कालीन संपुआ सरकारने २६ आॅगस्ट २०११ रोजी त्यांना झारखंडचे राज्यपाल नियुक्त केले होते. ते लेखकही करीत होते. ते महाराष्ट्रात गृहनिर्माण खात्याचे मंत्रीदेखील होते.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.