Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मृती इराणींची कॅबिनेट समितीतून हकालपट्टी

स्मृती इराणींची कॅबिनेट समितीतून हकालपट्टी
नवी दिल्ली , रविवार, 17 जुलै 2016 (13:42 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील ङ्खेरबदलानंतर कॅबिनेट समितीमध्ये देखील फेरबदल केले आहेत. कॅबिनेट मंत्रिपदाच्या फेरबदलामध्ये मोदी यांनी पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना धक्का दिला आहे. तसेच राजीव प्रताप रुडी आणि सदानंद गौडा यांची देखील कॅबिनेट समितीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. 
 
सदानंद गौडा यांच्याकडे संसदीय कामकाजासह संसदेच्या आर्थिक कामकाजाची जबाबदारी होती. राजीव प्रताप रुडी यांच्याकडील कायदे मंत्रिपदाची जबाबदारी काढून घेऊन त्यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास (स्वतंत्र कार्यभार) देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान  इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रिपद काढून घेऊन त्यांच्याकडे तुलनेने कमी दर्जाचे वस्त्रोद्योग खाते सोपविण्यात आले होते. यावेळी मोदी सरकारने स्मृती इराणीकडील मनुष्य विकास खात्याची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवली होती. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रकाश जावडेकर यांना संसदीय सभेच्या समितीचे कायमस्वरुपीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. 
 
कॅबिनेट सदस्यांची नियुक्ती ही मंत्रिपदावरुन केली जाते. कॅबिनेट समिती सदस्यांची नियुक्ती करणार्‍या दोन सदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ खडसेंना एसीबीकडून क्लीन चिट