Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनीमूनवरुन परतल्यानंतर हे काय केले नवर्‍याने...

हनीमूनवरुन परतल्यानंतर हे काय केले नवर्‍याने...
काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि मॉरिशस येथून हनीमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनीमूनवरुन परतल्यानंतर तिच्या नवर्‍याने तिला जोरदार झटका दिला. 24 वर्षाचा पती त्याच्या 42 वर्षाच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला. 
 
जबलपूरच्या गोरखपूर दत्त अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या निर्मित जैन 29 मेला मॉरिशसहून पत्नीसह हनीमूनवरुन परतला. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तो त्याच्या 42 वर्षाच्या प्रेयसीसोबत घरातून पळून गेला. जेव्हा ही गोष्ट नवविवाहितेला समजली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी नवविवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. निर्मित जैन व त्याची प्रेयसी शिवदासानी यांचे दोन वर्षापासून अफेअर सुरु होते. 
 
दोघांची लव्हस्टोरी संपूर्ण कटंगा परिसरात फेमस झाली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईच्या पावसावर लागला 500 कोटींचा सट्टा