Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हार्दिक समर्थकांनी शहांची सभा उधळली

हार्दिक समर्थकांनी शहांची सभा उधळली
सूरत , शनिवार, 10 सप्टेंबर 2016 (09:38 IST)
‘पाटीदार’ आंदोलनाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला गुजरातमध्ये पुन्हा एकदा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत गुरुवारी हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड केली. ‘हार्दिक.. हार्दिक’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. 
 
हार्दिक पटेल यांना पटेल समाजाकडून मिळत असलेले जोरदार समर्थन भाजपसाठी डोकेदुखीचा विषय होऊ लागला आहे. 2017 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपने मतदारसंघ पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे. सूरत शहरातील पटेल समाजाच्या एका उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘पाटीदार अभिवादन समिती’ या संस्थेतर्फे अमित शहा यांच्या उपस्थितीत पटेल समाजातील भाजप मंत्र्यांच्या सत्कार होणार होता. मात्र या सभेआधीच हार्दिक यांचे समर्थक जमले आणि घोषणा देऊ लागले. हार्दिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर तर परिस्थिती अधिकच चिघळत गेली आणि हार्दिक समर्थकांनी सामानाची मोडतोड सुरू केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटकात कडकडीत बंद शांततेत : कावेरी वाद पेटला