नवी दिल्ली- आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) नव्या देशांच्या समावेशासंदर्भात सदस्य देशांमध्ये अद्यापी मतभेद असून सेऊल येथे या आठवडय़ामध्ये होणार्या गटाच्या परिषदेदरम्यान नव्या देशांना सदस्यत्व देण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेसही घेतला जाणार नाही, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले.
‘एनएसजी’चे सदस्यत्व भारतास मिळण्यासंदर्भात चीनचा विरोध नसल्याचे विधान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच केले आहे. या पाश्र्वभूमीवर चीनकडून ही रोखठोक भूमिका स्पष्ट करण्यात आली.