Publish Date: Wed, 12 Aug 2015 (10:31 IST)
Updated Date: Wed, 12 Aug 2015 (10:33 IST)
जीएसटीवरुन विरोधकांनी सुरु केलेल्या गोंधळातच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तरांचा तास रेटला. तर याच मुद्यावर राज्यसभेचे कामकाज कॉँग्रेसने ठप्प केले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची ठिणगी पडली.
लोकसभा निवडणुकीतील पराभव अद्याप पचवता आलेला नाही, अशा शब्दांत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कॉँग्रेसवर आपला संताप व्यक्त केला. देशाचा विकास रोखणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, असे काँग्रेसला मुळीच वाटत नाही. काँग्रेसने अन्य मुद्द्यांच्या आडून कामकाज बंद पाडू नये. अर्थव्यवस्थेच्या विकासाला विरोध आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, कामकाज सल्लागार समितीला वेळ न दिल्याने या जीएसटी विधेयकावर चर्चा केली जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले.