Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पोकेमॉन गो’गेमप्रकरणी केंद्राला नोटीस

‘पोकेमॉन गो’गेमप्रकरणी केंद्राला नोटीस
गांधीनगर , शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 (09:43 IST)
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला मोबाईल गेम ‘पोकेमॉन गो’ अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या गेममुळे हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची जनहित याचिका, गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. ‘पोकेमॉन गो’ या गेममध्ये  अनेक धार्मिक स्थळे दाखवली आहेत. मात्र, या धार्मिक स्थळांमध्ये पॉईंट्ससाठी अंडी दाखवली आहेत. धार्मिक स्थळे पवित्र आहेत. याठिकाणी अंडी दाखवल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या गेमवर बंदी आणा, अशी याचिका करण्यात आली आहे. 
 
अनिल दवे यांनी ही याचिका केली असून त्यांच्यामते अंडे हे मांसप्रकारात मोडते. त्यामुळे मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी अंडी दाखवणे योग्य नाही. अनिल दवे यांचे वकील नचिकेत दवे यांच्या दाव्यानुसार, पोकेमॉन गेममध्ये पॉईंट म्हणून अंडी दिली जातात. विविध धर्माच्या मंदिरात ही अंडी दाखवली आहेत. मात्र हिंदू आणि जैन मंदिरात अंडी दाखवणे चुकीचे आहे. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला तसेच अमेरिकन डेव्हलपर कंपनीला नोटीस पाठवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी राष्ट्राध्यक्ष झाले तर.. हिलरी क्लिंटन