Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खारे दाणे

खारे दाणे

वेबदुनिया

WD
साहित्य : २ वाट्या कच्चे शेंगदाणे, पाणी, मीठ, तिखट.

कृती : कच्चे शेंगदाणे मध्यम आकाराच्या पातेल्यात पाण्यात भिजत घाला. शेंगदाणे बुडुन वर २५ मि.मि. पाणी राहू द्या. त्या पाण्यात २ चमचे मीठ घाला. १५ मिनिटे भिजल्यावर विस्तवावर त्या पाण्याला चांगली उकळी येऊन २-३ मिनिटे उकळू द्या.

थोड्या वेळाने ते दाणे रिवळीत किंवा चाळणीमध्ये घालून ५ मिनिटे निथळू द्या. दाणे खाण्याच्या काचेच्या पसरट बशीमध्ये एक थराने पसरून ते टोस्टर ओव्हन किंवा साध्या ओव्हन मध्ये ते काळजीपूर्वक भाजा. भाजलेले दाणे थंड होऊन द्यात. मग खायला तुम्ही मोकळे. हवे असेल तर भाजलेल्या दाण्यांची साले काढून टाका व वरून हवे असल्यास थोडे तिखट टाकावे. अशाच रितीने काजू किंवा बदाम खारवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi