Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रीत देवीला नऊ दिवसांचे नऊ विशेष प्रसाद

नवरात्रीत देवीला नऊ दिवसांचे नऊ विशेष प्रसाद

वेबदुनिया

, गुरूवार, 29 सप्टेंबर 2011 (11:54 IST)
ND
प्रथम दिवशी देवीला गायीच्या साजुक तुपाचे प्रसाद दाखवल्याने निरोगी राहण्याचा आशीर्वाद मिळतो.

दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा प्रसाद लावावा व तोच प्रसाद घरातील सर्व मंडळींना द्यावा. असं केल्याने आयुष्यात वाढ होते.

तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून तयार झालेली मिठाई व खिरीचा प्रसाद देवीला दाखवावा. असे केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व परम आनंदाची प्राप्ती होते.

चवथ्या दिवशी देवीला मालपुआचा प्रसाद द्यावा तसेच मंदिरात ब्राह्मणाला दान दिल्याने बुद्धीचा विकास होऊन निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळीचा प्रसाद दाखवल्याने शरीर स्वस्थ राहतं.

सहाव्या दिवशी देवीला मधाचा प्रसाद दाखवावा. ज्याने तुमच्यातील आकर्षण शक्तीत वाढ होईल.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा प्रसाद दाखवून तो प्रसाद ब्राह्मणाला दान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व अचानक येणारे संकट टळतात.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला नारळाचा प्रसाद दाखवावा व त्याचे दान करावे. याने संतानं संबंधी होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.

नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी तिळाचा प्रसाद दाखवून त्याचे ब्राह्मणाला दान करावे. असे केल्याने मृत्यू भय नाहीसा होत राहत नाही. तसेच अपघातापासून बचाव होतो.


Share this Story:

Follow Webdunia marathi