Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रीच्या नऊ दिवसात या वस्तू दिसल्यास स्वत:ला समजा भाग्यवान

webdunia
नवरात्रीत घटस्थापना करून नऊ दिवस मनोभावे देवीची आराधना केली जाते. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. देवीची विधिपूर्वक पूजा अर्चना करणार्‍यांना देवी काही संकेत देखील देते ज्याने देवी भक्तावर प्रसन्न असल्याचे समजू शकता. आपल्यावर देवीची कृपा आहे हे संकेत आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
 
नवरात्रीत आपल्याला घुबड दिसल्यास देवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या घरात धन-संपदा येणार असल्याचे संकेत आहे. आपल्या स्वप्नात जरी घुबड दिसला तरी हे स्वप्न उत्तम फल देणारे ठरणार आहे समजावे. 
 
नवरात्रीत रस्त्यावरून जाताना आपल्याला श्रृंगारीत सवाष्ण दिसल्यास आपले दु:खाचे दिवस सरले असून आपल्यावर देवीची कृपा होणार असे समजावे. हे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्याचे संकेत आहे.
 
नवरात्रीत नऊ दिवसांमध्ये कधीही सकाळी नारळ किंवा कमळाचं फुलं दिसल्यास दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होणार आहे समजावे. 
 
नवरात्रीत मंदिरातून दर्शन करून बाहेर पडल्यावर गाय दिसल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार असे समजावे.
 
नवरात्री दरम्यान स्वप्नात नाग एका जागी बसलेला दिसल्यास आपल्या लवकरच धनलाभ होऊन घरात संपन्नता येईल असे समजावे. 
 
नवरात्री दरम्यान स्वप्नात शंख दिसल्यास व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. कारण ज्या प्रकारे शंखाच्या ध्वनीमुळे पूर्ण वातावरण घोळली जाते त्याच प्रकारे देवी आईच्या कृपेमुळे आपलं नाव संपूर्ण जगात गाजू शकतं.
 
आपल्या स्वप्नात एक लहानशी कन्या शिक्का देताना दिसली तर हे शुभ संकेत आहे कारण कुमारिका साक्षात दुर्गा देवीचा रूप असल्याचे मानले गेले आहे. 
 
तर या प्रकारे प्रत्यक्ष किंवा स्वप्नात मिळणार्‍या संकेतांवरून देवीची कृपा आपल्यावर असल्याचे कळून येतं. नवरात्रीत आपल्या स्वप्नात देखील देवी लक्ष्मी दर्शन देत असेल तर आपल्याला धनलाभ होणार असे समजावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात का ठेवत नाही शनीची प्रतिमा