जुन्या परंपरा ,जुन्या रूढी आल्या चालत,
आया बयानो आता करा चैत्र गौरी चे स्वागत,
येई गौराई राहण्या माहेरी ग तिच्या,
होई सारेच प्रसन्न, लागा सरबराईस तिच्या,
खाऊ घाला तिस, नानाविध जिन्नस,
लाडू करंज्या करा घरी, शंकरपाळे खरपूस,
सजवून गौर सुरेख, करा देखावा उभा अंगणी,
येतील आया बाया, नटेल घरची साजणी,
हळदीकुंकू लावा, ओटी भरा हरभऱ्याची,
देऊन वाण सवाष्णीस,स्तुती करा गौराईची.