Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chaitra Navratri 2022 नोकरी- व्यवसाय, नातेसंबंधी प्रत्येक समस्या दूर होईल, फक्त चैत्र नवरात्रीला हे काम करा

Chaitra Navratri 2022 नोकरी- व्यवसाय, नातेसंबंधी प्रत्येक समस्या दूर होईल, फक्त चैत्र नवरात्रीला हे काम करा
, गुरूवार, 31 मार्च 2022 (13:16 IST)
Chaitra Navratri 2022: नवरात्रीचे आगमन होताच आजूबाजूचे वातावरण भक्तिमय होऊन जाते. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवीची पूजा करतो. अनेकजण आईसाठी नऊ दिवस उपवास ठेवतात, पण नोकरदारांना उपवास करणे थोडे अवघड जाते. अशा स्थितीत उपवास ठेवता येत नसल्याची खंत बाळगू नका, कारण मातृदेवतेची मनापासून स्तुती करूनच माता आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते. यासोबतच नवरात्रीमध्ये असे काही उपाय केले जातात ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात.

Chaitra Navratri 2022 Upay चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर काही उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकतं. हे नवरात्र तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख घेऊन येईल. काही छोटे उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. ते उपाय जाणून घेऊया- 
 
तुमच्या व्यवसायात आणि नोकरीवर कोणाची वाईट नजर लागली असेल किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या वेळी लाल कपड्यात पाच लिंबू, एक मूठ पिवळ्या मोहरी, आणि एक नाणे याची पोटली तयार करा. ही पोटली कार्यस्थळी ठेवा. आणि दुसर्‍या दिवशी पोटली एका निर्जन जागी खड्ड्यात पुरून टाका.
 
दारिद्रय दूर करण्यासाठी अष्टमीच्या दिवशी देवघरात उत्तर दिशेकडे मुख करुन बसावे. समोर अक्षता ठेवून त्यावर श्रीयंत्र ठेवावे. त्यासमक्ष मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावावे आणि देवीच्या सर्व रुपांचे स्मरण करत आपली समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करावी. पूजा केल्यानंतर अक्षता नदीत प्रवाहित कराव्यात आणि श्रीयंत्र तिजोरीत ठेवावं. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
 
नोकरी शोधत असणार्‍यांनी नवरात्रीत सकाळी लवकर उठून आंघोळ करुन देवीची पूजा करावी आणि आपली मनोकामना सांगावी. नंतर स्फटिकच्या माळीने ॐ ह्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नऊ दिवस हा उपाय केल्याने नक्की यश मिळेल.
 
जोडीदाराशी संबंध सुधारण्यासाठी कृष्ण मंदिरात बासरी आणि पान अर्पण करा. तुमच्या नात्यातील अडचणी दूर होतील. तसेच दुर्गा देवीला लाल रंगाची ओढणी किंवा साडी आणि ध्वज अर्पण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती