Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र 9 दिवसचं का, जाणून घ्या 10 दुर्लभ गोष्टी

नवरात्र 9 दिवसचं का, जाणून घ्या 10 दुर्लभ गोष्टी
1 नवदुर्गा कोण आहे - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री. नमूद केलेल्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत मिळतात. काही याना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात, तर काही लोक ह्यांना माता पार्वतीचे रूप मानतात. पर्वत राज हिमालयाची मुलगी असल्यामुळे ह्यांना शैलपुत्री म्हटलं जात. ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले. चंद्रघंटा म्हणजे ज्यांचा डोक्यावर चंद्राकार टिळक आहे. ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्यात साऱ्या ब्रह्माण्डला समाविष्ट करणारी कुष्मांडा म्हणवते. त्यांच्या मुलाचे कार्तिकेयाचे नाव स्कंद आहे. म्हणून त्या स्कंद माता देखील म्हणवल्या जातात. यज्ञाच्या अग्नित भस्मसात झाल्या वर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी त्याचा घरी मुलगी म्हणून जन्म घेतले म्हणून त्यांना कात्यायनी देखील म्हणतात. असे म्हणतात की कात्यायिनी नेच महिषासुराचे वध केले असे म्हणून त्यांना महिषासुरमर्दिनी देखील म्हणतात. यांचे एक नाव तुळजा भवानी देखील आहे. देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारी आहे. म्हणून यांना कालरात्री देखील म्हणतात. 
 
आईचे रंग पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे. म्हणून त्यांना महागौरी देखील म्हणतात. जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करतं देवी आई त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतात म्हणून त्यांना सिद्धीदात्री देखील म्हणतात.
 
2 नवरात्र का साजरे करतात - या मागील 2 कारणे आहेत पहिले असे की आई दुर्गेचे महिषासुराशी 9 दिवसापर्यंत युद्ध चालले होते आणि 10 व्या दिवशी त्यांनी असुराचं वध केले होते, म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो नंतर रामाने याच दिवशी रावणाचे वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. दुसरे कारण आख्यायिका वर आहे आईने नऊ महिन्यापर्यंत कटरा (वैष्णव देवी) च्या गुहेत तपश्चर्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले होते. नंतर हनुमानाचे आणि भैरवनाथाचे युद्ध झाले शेवटी देवी आईने गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचे वध केले. 
 
3 वर्षातून 4 वेळा येते नवरात्री : वर्षात चार नवरात्र असतात. या चार नवरात्रा पैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात. पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येतं आणि दुसरे नवरात्र अश्विन महिन्यात येतात. चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जातो आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र  म्हणतात आषाढ आणि माघ मासात गुप्त नवरात्र येतात. हे गुप्त नवरात्र तांत्रिक साधनांसाठी असतात. आणि साधारण किंवा सामान्य नवरात्र शक्तीच्या साधनेसाठी असतात.
 
4 नवरात्राचे 9 चं दिवसच का : खरं तर या 9 दिवसात निसर्गामध्ये बदल होतात. त्याच बरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरात देखील बदल होतात. निसर्गातील आणि शरीरातील शक्ती समजल्याने शक्तीच्या पूजेचे महत्त्व समजतात. चैत्र आणि अश्विनच्या नवरात्राच्या वेळी ऋतूमान बदलतं. ऋतूचे आपल्या जीवनात, विचारात आणि धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपल्या ऋषी-मुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाचा काळाला नवरात्र म्हटले. जर का आपण त्या 9 दिवसात म्हणजे वर्षाचे 18 दिवस अन्न त्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहत. 
 
5 साधनेचा काळ : अंकांमध्ये 9 अंक हे पूर्ण मानतात. या अंकानंतर कोणते ही अंक नाही. ग्रहांमध्ये देखील 9 ग्रह असतात. म्हणून साधना देखील 9 दिवसाची मानतात. एखाद्या माणसाच्या शरीरात 7 चक्र असतात जे जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात. नवरात्राच्या या 9 दिवसांमध्ये 7 दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जातो. 8 व्या दिवशी शक्तीची पूजा करतात. 9 व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असतो. शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या आतील शक्ती जागृत होते म्हणजे शक्ती प्राप्त होते. या सप्त चक्रांना बघितले तर हा दिवस कुंडलिनी जागरण म्हणून मानतात. म्हणून हे 9 दिवस देवी आईच्या 9 रूपाशी जोडले जातात. शक्तीच्या या 9 रूपांनाच प्रामुख्यानं पुजतात. हे 9 रूपे आहेत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा देवी, कुष्मांडा देवी, स्कंद माता, कात्यायनी, आई काली आणि आई महागौरी आणि सिद्धीदात्री आहेत. शेवटी सिद्धी आणि मोक्षच मिळतं.
 
अश्या प्रकारे आपल्या शरीरात 9 छिद्रे असतात. दोन डोळे, दोन कान, नाकाचे दोन छिद्र, दोन गुप्तांग आणि तोंड. या 9 अंगांना पावित्र्य आणि शुद्ध केल्यानं मन निर्मळ होऊन सहाव्या इंद्रियांना जागृत करतं. झोपेत या सर्व इंद्रिय सुप्त अवस्थेत असतात आणि फक्त मन जागृत राहत. वर्षभरातील 36 नवरात्राचे उपवास केल्यानं शरीराच्या अंतर्गत अंगांची पूर्णपणे स्वच्छता होते.
 
6 मनातली इच्छा पूर्ण होते : पुराणानुसार या 9 दिवसात जे अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करतं, देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करत, त्याचे संकल्प देखील पूर्ण होतात. या वेळी कठोर ध्यान करण्याचे नियम आहे. बरेच लोक आपल्या मनाचे काही नियम बांधून उपवास धरतात, जे योग्य नाही जसे की काही लोक चपला घालणं सोडतात, काही लोक फक्त खिचडी खातात जे अयोग्य आहे. शास्त्रात ठरवलेले उपवासच योग्य असतात. 
 
7 नवशक्ती आणि नवधा भक्ती : आई पार्वती, शंकरजींना प्रश्न करतात की 'नवरात्र कशाला म्हणतात !' शंकरजी त्यांना समजावतात नव शक्तिभि: संयुक्त नवरात्रं तदुच्यते, एकैक देव-देवेशि! नवधा परितिष्ठता. म्हणजे नवरात्र हे नऊ शक्तींनी जोडले आहे. याचा प्रत्येक तिथीला प्रत्येक शक्तीची उपासना करण्याचा कायदा आहे.
 
8 रात्रीचं महत्त्व : नवरात्र या शब्दाचा अर्थ म्हणजे 'नव अहोरात्राची प्राप्ती(विशेष रात्री), रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे. भारतातील प्राचीन ऋषी-मुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. हेच कारण आहे की दिवाळी, होळी, शिवरात्र आणि नवरात्रीचे सण रात्रीच साजरे करतात. जर रात्रीचे कोणतेही गूढ नसते तर या सणांना रात्र नसून दिवस म्हटले गेले असते. जसे नवदिन, शिवदिन पण आपण असे म्हणत नाही. शैव आणि शक्तीशी निगडित असलेल्या धर्मात रात्रीचे महत्त्व आहे तर वैष्णव धर्मात दिवसाला महत्त्व आहे. म्हणून या रात्री मध्ये सिद्धी आणि साधना किंवा ध्यान केले जाते (या रात्री केलेले शुभ संकल्प सिद्ध असतात).
 
9 वेगवेगळ्या रूपात देवी  : वेग वेगळ्या देवी असतात मध्ये त्रिदेवी, नवदुर्गा, दशमहाविद्या आणि चौसष्ट योगिनीचे गट आहे. आदिशक्ती अंबिका सर्वोच्च आहे आणि त्याचेच अनेक रूपे आहेत. सती, पार्वती, उमा आणि काळी माता या भगवान शंकराची पत्नी आहे. (अंबिकानेच दुर्गमसुराचे वध केले होते म्हणून त्यांना दुर्गा माता म्हणतात). प्रत्येक देवी ला त्यांचा वाहन, हात आणि अस्त्र -शस्त्राने ओळखले जाते. जसे की अष्टभुजाधारी देवी दुर्गा आणि कात्यायनी सिंहावर बसलेली आहे तर आई पार्वती, चंद्रघण्टा आणि कुष्मांडा वाघावर बसलेल्या आहे. शैलपुत्री आई महागौरी वृषभ वर, काळरात्री गाढवावर आणि सिद्धीदात्री कमळावर बसलेल्या आहेत. (अश्याच प्रकारे सर्व देवींच्या वेग-वेगळे वाहन आहेत.)
 
10 नऊ देवींचे नऊ नैवेद्य : शैलपुत्री कुट्टू आणि हरड, ब्रह्मचारिणी -दूध -दही आणि ब्राह्मी, चंद्रघण्टा चवळी, आणि चंदूसुर, कुष्मांडा पेठा, स्कंदमाता वरईचे तांदूळ किंवा भगर आणि अळशी, कात्यायनी हिरवी भाजी आणि मोइया, काळरात्री काळीमिरी, तुळस आणि नागदौन, महागौरी साबुदाणा तुळस, सिद्धीदात्री आवळा आणि शतावरी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mumba Devi Temple 400 वर्ष जुने मुंबादेवी मंदिर, नवसाला पावणारी देवी