Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे
, सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (12:23 IST)
नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्तव आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल. सर्वात आधी बघू की कोणत्या वयाची कन्या पूजल्याने काय फळ मिळतं ते:

कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे.
दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं.
तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख- समृद्धी नांदते.
चार वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं.
रोहिणी रूपा पाच वर्षाच्या कन्येला पुजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते.
सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते.
सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते.
शांभवी रूपात आठ वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास विजय प्राप्ती होते.
नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असून शत्रूंचा नाश करते.
सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या पुजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
आता बघू की काय करावे
 
कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. पाय धुऊन त्यावर कुंकू लावावे.
स्वच्छ आसनावर बसवावे.
कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करवावे. किंवा प्रसाद म्हणून खीर पुरी, शिरा असे नैवेद्य दाखवावे.
यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेट वस्तू द्यावी.
आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यशाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. जमत नसल्यास एक कुमारिकेचे केले तरी फळ प्राप्ती होते. तरी येथे आम्ही सांगू की किती कन्या पुजल्याचे काय फळ आहेत ते:
 
एक कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर्य प्राप्ती होते. तसेच दोन कुमारिकेचे पूजन केल्यास मोक्षप्राप्ती होते. तीन कुमारिका पुजल्यास अर्थ-धर्म आणि काम प्राप्ती होते. राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते. विद्या प्राप्तीसाठी पाच तर षटकर्मसिद्धी साठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते. सात कुमारिका पुजल्याने राज्य प्राप्ती तर संपत्ती प्राप्ती साठी आठ कुमारिका पुजल्या जातात. नऊ कुमारिका पुजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते.
कन्या पूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते!