Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Navaratri 2021 दुर्गा पूजा मध्ये महालया म्हणजे काय ? जाणून घ्या महत्व व इतिहास

Navaratri 2021 दुर्गा पूजा मध्ये महालया म्हणजे काय ? जाणून घ्या महत्व व इतिहास
, मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (13:31 IST)
नवरात्री 2021: शारदीय नवरात्रीच्या दुर्गापूजेमध्ये महालयाला विशेष स्थान आहे. महालयाच्या दिवसापासून दुर्गा पूजेला सुरुवात होते. बंगालचे लोक वर्षभर या महालयाची वाट पाहतात. ही धार्मिक श्रद्धा आहे की श्राद्ध महालयाने संपतो आणि या दिवशी माते दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येतात आणि पुढील 10 दिवस येथे राहतात.
 
महालया काय आणि कधी ?
शास्त्रांप्रमाणे महालया आणि सर्व पितृ अमावस्या एकाच दिवशी असते. पंचांगानुसार यंदा सर्व पितृ अमावस्या आणि महालया एकच दिवशी अर्थात 6 ऑक्टोबरला बुधवारी आहे. महालयाच्या दिवशी मूर्तिकार दुर्गा देवीचे डोळे तयार करतात. यानंतर मुरत्यांना अंतिम रूप दिला जातो. यानंतर दुर्गा देवीच्या मुरत्या पांडालांची शोभा वाढवतात.
 
महालया इतिहास
पौराणिक मान्यतेनुसार अत्याचारी राक्षस महिषासुराचा संहार करण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी दुर्गा देवीच्या रुपात एक शक्तीचे सृजन केले होते. महिषासुराला वरदान मिळाले होते की कोणताही मनुष्य किंवा देवता त्याचं वध करु शकत नाही. या अभिमानामुळे महिषासुराने सर्व देवतांना पराजित करुन देवलोकावर आपला हक्क गाजवायला सुरु केले. तेव्हा देवत भगवान विष्णुंच्या शरणात आले आणि महिषासुराच्या अत्याचारापासून बचावासाठी त्यांनी आदि शक्तीची आराधना केली.    
 
या दरम्यान सर्व देवतांच्या शरीरातून दुर्गा देवीच्या रुपात एक शक्ती प्रकट झाली. मां दुर्गा अस्त्र आणि शस्त्राने सुसज्जित होती. त्यांनी महिषासुरासोबत भीषण युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचं वध केलं.
 
धार्मिक मान्यता आहे की महिषासुराच्या सर्वनाश हेतु महालया च्या दिवशी मां दुर्गेचं आह्वान केल्यानंतर अवतरण झालं होतं. असे म्हणतात की महलाया अमावस्येच्या सकाळी सर्वप्रथम पितरांना विदाई दिली जाते नंतर संध्याकाळी दुर्गा देवी कैलाश पर्वताहून पृथ्वी लोकात येते आणि पूर्ण नऊ दिवसांपर्यंत भक्तांच्या कल्याणार्थ त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Wedding Rules: लग्नाची तारीख ठरवताना या 5 चुका करू नका, अन्यथा ते अशुभ ठरेल