Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानमधील देवीच्या या मंदिराला हज मानतात मुस्लिम

hinglaj mata
, गुरूवार, 11 एप्रिल 2024 (20:00 IST)
तुम्हाला माहित आहे का? पाकिस्तान मध्ये एक असे मंदिर आहे. ज्याची यात्रा अमरनाथ यात्रेपेक्षा ही कठीण आहे. तरी देखील नवरात्रीमध्ये इथे पुष्कळ गर्दी असते. जगाच्या वेगवेगळ्या देशांमधून लोक हिंगलाज माताचे दर्शन करण्यासाठी इथे येतात. हिंगलाज मंदिर पूर्ण जगामध्ये 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. नवरात्रीमध्ये या मंदिराची तशीच पूजा केली जाते, जशी भारतातील मंदिरांमध्ये केली जाते. हे मंदिर पाकिस्तानमधील बलूचिस्तान मध्ये स्थापित आहे. 
 
हिंगलाज मंदिरला घेऊन मान्यता- 
हिंगलाज मंदिर हिंगोल नदीच्या तीरावर स्थापित आहे. पौराणिक कथेनुसार वडिलांनी केलेल्या अपमानामुळे दुःखी होऊन सतीने स्वतःला हवनकुंडामध्ये अर्पित केले. पत्नी वियोगाने क्रोधीत होऊन भगवान शंकर हे सतीच्या शवाला खांद्यावर घेऊन तांडव करायला लागले. भगवान शिवांना थांबवण्यासाठी श्री हरि विष्णूंनी चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. सतीच्या शरीराचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठ नाव दिले गेले. सतीच्या शरीराचा पहिला भाग म्हणजे डोके किर्थर पर्वतावर पडले. यालाच हिंगलाज मंदिर नावाने ओळखले जाते. याचा उल्लेख शिवपुराण पासून घेऊन कालिका पुराण पर्यंत मिळतो. 
 
का अमरनाथ पेक्षा अधिक कठीण आहे हिंगलाज माताची यात्रा-
या मंदिराबद्दल सांगितले जाते की, याची यात्रा अमरनाथ पेक्षा देखील अधिक कठीण आहे. इथे सुरक्षा यंत्रणा नाही. यासाठी लोक  इथे 30-40 लोकांचा ग्रुप बनवून यात्रा करतात. कोणी पण यात्री 4 पड़ाव आणि 55 किलोमीटरची पायदळ यात्रा करून हिंगलाज पोहचतात. सांगू इच्छिते की, 2007 पूर्वी इथे पोहोचण्यापूर्वी  200 किलोमीटर पायदळ चालावे लागत होते. यामध्ये 2 ते 3 महिन्यांचा वेळ लागत होता. 
 
या मंदिराला हज मानतात पाकिस्तानचे मुस्लिम- 
हिंगलाज मातेचे हा मंदिर पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या हिंदू  बाहुल्य परिसरात स्थित आहे. इथे हिंदू-मुस्लिम मध्ये भेदभाव नाही. पाकिस्तानमधील मुस्लिम या मंदिराला हज मानतात. अनेक वेळेस आरतीच्या वेळेस मुस्लिम लोक हात जोडून उभे राहतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनूमत्कृतसीतारामस्तोत्रम्